लोणावळ्याच्या सौ पल्लवी राजाराम पाटील मिसेस व्होगस्टार इंडिया २०२४ विजेता लोणावळा सिटी या खिताबाची अभिमानास्पद विजेती घोषित

मावळ मराठा न्युज :-लोणावळा, मिस/मिसेस व्होगस्टार इंडिया २०२४ हा कार्यक्रम ११ एप्रिल २०२४ ते १६ एप्रिल २०२४ दरम्यान लेमेरिडियन रिसॉर्ट आणि स्पा जयपूर येथे आयोजित करण्यात आला होता. यात सौ पल्लवी राजाराम पाटील, ह्यांनी १४ एप्रिल २०२४ रोजी मिसेस व्होगस्टार इंडिया २०२४ विजेता लोणावळा सिटी या खिताबाची अभिमानास्पद विजेती म्हणून घोषित करण्यात आले आहे.व्होगस्टारची प्रक्रिया डिसेंबरमध्ये व्होगस्टार पेजेंट ॲप्लिकेशनच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सुरू झाली. नोंदणीनंतर दोन महिन्यांची ऑनलाइन प्रशिक्षण सत्रे झाली. मार्च २०२४ मध्ये प्रत्यक्ष ऑडिशन फेऱ्या आभासी मोडद्वारे झाल्या. पहिली फेरी – परिचय आणि दुसरी फेरी – रॅम्पवॉक अशी होती.सौ पल्लवी राजाराम पाटील यांची २२ मार्च २०२४ मध्ये लोणावळ्यासाठी अधिकृत व्होगस्टार शहर प्रतिनिधी म्हणून निवड झाली. अंतिम फेरी लेमेरिडियन,जयपूर या पंचतारांकित ठिकाणी झाली. पल्लवी ह्या लोणावळ्याच्या असून त्यांची कामगिरी खरोखर लोणावळ्यासाठी गौरवाची बाब आहे. सौ पल्लवी राजाराम पाटील यांचे माहेरच नाव, पल्लवी पांडुरंग हार्डे असे असून त्या ,शांतीवन सोसायटी, नांगरगाव, लोणावळा येथे राहतात.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page