इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे तर्फे “आरोग्य संपन्न स्त्री जनजागृती” “- शोभायात्रेद्वारे संपन्न



मावळ मराठा न्युज :- तळेगाव,भारतीय संस्कृतीने स्वीकारलेल्या पोशाखात भव्य बाईक रॅलीद्वारे महिला बाईक रॅली काढून मंगळवार दिनांक ९ एप्रिलचा गुढी पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे पाणी वाचवा, अन्न वाचवा आणि कर्करोग निदान व उपचार जनागृतीसाठी भव्य वूमन बाईक रॅली काढण्यात आली. क्लब प्रेसिडेंट संध्या थोरात यांच्या संकल्पनेतून रॅलीचे आयोजन करताना प्रकल्प प्रमुख डॉ दीपाली भंडारी आणि रश्मी थोरात यांनी संपूर्ण नियोजन केले. रॅलीमध्ये तळेगावातील विविध कला व सांस्कृतिक मंडळातील १२० महिलांनी उत्स्फूर्त आपला सहभाग नोंदविला होता . नऊवारी साडी, नथ, पारंपरिक दागिने घालून विविध घोषणा देत ही रॅली शंभर टक्के यशस्वी केली. इनरव्हील क्लब तर्फे सर्वांना जरीकाठाचे केशरी फेटे बांधण्यात आले. संध्याकाळी पाच वाजता इनरव्हील क्लब हॉल पासून स्टेशन चौक, नगरपालिका, लिंब फाट्यापर्यंत दिमाखात जाऊन भंडारी हॉस्पिटल येथे थंडगार सरबत देऊन या रॅलीची सांगता झाली. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे डॉ. शाळिग्राम भंडारी यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याबरोबरच विविध शेरो शायरी आणि दृष्टांत्वाद्वारे उपस्थित महिला सभासदांना आरोग्य संदर्भात मार्गदर्शन केले! उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्कृष्ट स्लोगन अशी बक्षिसे देऊन रॅलीची सांगता करण्यात आली! महिला आरोग्य जनजागृतीच्या या आगळ्या वेगळ्या शोभायात्रेस चार्टर प्रेसिडेंट अल्भा पारेख तसेच पास्ट प्रेसिडेंटस् शर्मिला शहा, नीता देशपांडे वैशाली जामखेडकर, ट्रेजरर भाग्यश्री काळेबाग, आयएसओ वैभवी कारके क्लबच्या माजी पदाधिकारी आणि सदस्या या प्रत्यक्ष उपस्थित राहून नवीन सदस्यांना प्रोत्साहित करीत होत्या. प्रेसिडेंट संध्या थोरात आणि प्रकल्प प्रमुख डॉ दीपाली भंडारी यांनी आहार विहार आणि पेय जलाच मानवी जीवनात आरोग्यासाठी असलेलं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या मनोगतात व्यक्त करून त्यांचा अपव्यय कसा टाळता येईल याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्याबरोबरच वाढत्या कर्करोगाच्या आजाराला वेळीच तपासणी करून पायबंद घालण्यासाठी प्रत्येकाने अत्याधुनिक तपासणी करून घेणे किती आवश्यक आहे हेही त्यांनी विशद केले. या रॅली आयोजनामागील हीच संकल्पित उद्दिष्ट सफल झाली तर- खऱ्या अर्थाने शंभर टक्के रॅली यशस्वी झाल्याचं समाधान- याच रॅली समाप्तीच्या वेळी आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आपण अनुभवणार आहोत अशा भावना त्यांनी पुढे आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. जॉईंट सेक्रेटरी रश्मी थोरात यांच्या आभार प्रदर्शनाने रॅलीचा समारोप करण्यात आला.




