लोणावळा महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व त्यांच्या विचारावर आधारित पुस्तकांचा ग्रंथोत्सव साजरा


मावळ मराठा न्युज लोणावळा,लोणावळा महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व त्यांच्या विचारावर आधारित पुस्तकांचा ग्रंथोत्सव सोमवार, दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात आला.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख श्रीमती एनी वर्गीस यांनी फीत कापून ग्रंथोत्सवाचे उद्घाटन केले व प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून नमन केले.यावेळी प्राचार्य देखमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना ग्रंथोत्सवबाबत व भारताच्या संविधानाबाबत माहिती दिली.लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्तांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा त्यांच्या विचारावर आधारित पुस्तकांचा ग्रंथोत्सवास शुभेच्छा दिल्या.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा त्यांच्या विचारावर आधारित पुस्तकांचा ग्रंथोत्सवात सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून २५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मच्याऱ्यानी सहभाग घेतला.ग्रंथोत्सव यशस्वी पार पाडण्याकरिता ग्रंथालय समिती प्रमुख डॉ. सुपर्ण मित्रा, सौ. चांगुणा ठाकर-येवले, डॉ. श्रीकांत होगले व कु. अंजुषा पडवळ आदींनी परिश्रम घेतले.




