*खड्डे मुक्त लोणावळासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन*







मावळ मराठा न्युज – लोणावळा,महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा व मनसे लोणावळा अध्यक्ष श्री.निखिल हनुमंत भोसले. यांच्या वतीने लोणावळा शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पत्र देण्यात आले. लोणावळ्यातील सर्व भागातील आणि प्रभाग क्र. १ मधील न्यू तुंगार्ली, इंदिरानगर, अंबरवाडी रोड, गोल्ड व्हॅली परिसर, प्रिचली हिल या विभागातील रस्त्याची परिस्थिती खुप खराब असून त्या रोडवर खुप खड्डे पडले आहेत आणि त्या खड्ड्यात बाईक चालवताना पडत असतात हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आता यापुढे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण गणेशउत्सव येत असून या रोड वरून गणेश मिरवणूक सुद्धा निघत असते आणि या रोड ची परिस्थिती खुप गंभीर असून लवकरात लवकरच आपण हे काम मार्गी लावावे अशी विनंती नगरपरिषदेला करण्यात आली सदर काम मार्गी न लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन उभारेल असेही कळविण्यात आले …यावेळी उपस्थित मा.प्रवक्ते अमित भोसले,सुनिल साळवे, संघटक अभिजित फासगे, सुनील सोनावणे, निलेश लांडगे, जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, आकाश सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



