टूलिंग एक्पोचे गुरुवारी चिंचवडमध्ये उदघाटन

मावळ मराठा न्युज :- पिंपरी (प्रतिनिधी) एनटीटीएफ ॲल्युमिनी असोसिएशन पुणे चॅप्टरच्या वतीने दि १८ आणि १९ एप्रिल २०२४ रोजी पिंपरी चिंचवड मधील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटरयेथे ‘टूलिंग एक्पो, पुणे २०२४ ‘ हे प्रदर्शन होणार आहे. यावेळी फोक्सवॅगन कंपनीचे उप महाव्यवस्थापक मनोज पाटील, सप्लाय चेन आणि गुणवत्ता विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक टाटा मोटर्सचे भट्ट हे उपस्थित राहणार आहे. सदर प्रदर्शनाचे ‘NTTF ॲल्युमिनी असोसिएशन, पुणे चॅप्टर’ यांनी आयोजक आहे. या प्रदर्शनात टूलिंग संदर्भातील वेगवेगळ्या प्रोफाईल असलेल्या कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने टूलिंग इंडस्ट्रीजला लागणारे सॉफ्टवेअर, प्रेस टूल, मोल्ड पार्ट,डाय कास्टिंग उत्पादक,कॉम्पोनंट, फिक्चर / गेज /एसपीएम उत्पादक, मशीन मॅन्युफॅक्चर आणि इन्स्पेक्शन इक्विपमेंट उत्पादक अशा ६० कंपन्या सहभागी झालेल्या आहे. या प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणुन हस्को आणि एटीक्यू मेट्रो लाभले आहे.अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page