लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज यांच्या वतीने २५ गरीब आणि गरजूना किराणा किट चे वाटप

मावळ मराठा न्युज:- लोणावळा,सुप्रीमो सदस्य जिल्हा पदाधिकारी आणि शुभचिंतक,मित्र आणि दानशूर देणगीदार सुप्रिमो टीम यांच्या वतीने दिनांक २६ मार्च २०२४ रोजी गरीब आणि गरजू २५ कुटुंबांना २५ रेशन किटचे वाटप करण्यात आले. लोणावळा येथील या धान्य किट वाटपाच्या सामाजिक उपक्रमाचे नेतृत्व Addtnl DC Hunger लायन सुधीरकदम आणि DC जीवनदया लायन सुरैय्या वाडीवाला यांनी केले. यावेळी खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे चे पोलीस निरीक्षक उमेश परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज चे अध्यक्ष लायन जयराम लिंगे गौडा यांच्या नेतृत्वाखाली पार पडला . यावेळी मौल्यवान दात्यांच्या आर्थिक पाठिंब्याने सदर कार्यक्रम पार पडल्याने लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोजने दानशूर व्यक्तींचे आभार मानले..

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page