लोणावळा नगरपरिषद सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा ३ .० अंतर्गत विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण १७ जानेवारीला

मावळ मराठा न्यूज,लोणावळा:- लोणावळा नगरपरिषद स्वच्छता अभियानात राष्ट्रीय पातळीवर अग्रेसर राहिला आहे. त्यासाठी लोणावळा नगरपरिषदेला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळवून त्यातून विकास कामे करून शहराचा चेहरा मोहरा बदलला यात नगराध्यक्षा सुरेखा जाधव,उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी लोणावळा नगरपरिषदेचे कर्मचारी, अधिकारी,सामाजिक संस्था पत्रकार, कलाकार यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग यात असल्याने यासंदर्भात याही वर्षी सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा ३ .० अंतर्गत बक्षिस समारंभ लोणावळा नगरपरिषदेने स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा ३ .० या मोहीमेच्‍या अनुषंगाने सिटीझन एन्गेजमेन्ट या अंतर्गत जनजागृती करीता विविध स्‍पर्धा घेण्‍यात आलेल्‍या होत्‍या. यामध्‍ये चित्रकला, पोस्‍टर, जिंगल, शॉर्ट मुव्‍ही, वेस्‍ट टू बेस्‍ट, बेस्‍ट शाळा, हॉस्‍पीटल, निबंध, पथनाटय, स्‍वच्‍छ टेक्‍नोलॉजी चॅलेज इ. या विविध स्‍पर्धेमधील बक्षिसपात्र विदयार्थी, शिक्षक व मुख्‍याध्‍यापक, नागरिक यांचा गौरव करणेकरीता बक्षिस समारंभ मंगळवार, दि.१७/१/२०२३ रोजी सायं. ६ .०० वा. हॉटेल मेपल हॉल येथे आयोजीत केलेला आहे. तरी सन्‍माननीय सर्व पदाधिकारी, सर्व असोसिएशन, सामाजिक संस्‍था, पत्रकार, शाळा, विदयार्थी, सर्व नागरिक यांनी या बक्षिस समारंभ कार्यक्रमास उपस्थित राहून बक्षिसपात्र विदयार्थी, नागरिकांना प्रोत्‍साहन दयावे असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेमार्फत मुख्‍याधिकारी पंडित पाटील यांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page