शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर भोसरी येथे संपन्न


मावळ मराठा न्यूज:- पिंपरी,कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचे संकल्पनेतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर भोसरी येथे अंकुशराव लांडगे सभागृहात भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.याप्रसंगी बोलताना आमदार महेशदादा लांडगे यांनी या शिबिरांच्या आयोजनामागचा सरकारचा उद्देश स्पष्ट केला.सरकारी योजना,उपक्रम सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळण्यासाठी अशा शिबिरांचा लाव घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा श्री प्रदीप कदम यांनी करिअर ची व्याख्या समजावून देताना,ज्या क्षेत्रात तुम्हाला तुमचे सर्वोच्च योगदान देता येईल असे तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा व त्यात स्वतः ची ओळख निर्माण करणे हेच करिअर असे प्रतिपादन केले.यावेळी विद्यार्थ्यांना विविध सरकारी शिष्यवृत्ती,कर्ज योजना याविषयी कौशल्य विकास चे निवृत्त वरिष्ठ अधिकारी श्री एच आर सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी श्री कुंदन दादा लांडगे यांनी विद्यार्थ्यांना संरक्षण विषयक करिअर ची माहिती दिली व युवकांना सदृढ व सक्षम बनण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमास आय आय बी संस्थेचे श्री महेश लोहारे,ॲड.निता लोहारे, वल्ड वाईज ऑईल फिल्ड मशीन चे एच आर हेड श्री शिवाजी चौंडकर यांनी औद्योगिक क्षेत्रातील करिअर च्या विविध संधी याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य श्री शशिकांत साबळे व श्री गरदडे यांनी केले.कार्यक्रमासाठी निखिल कलकुटे,रिषभ खराडे,ढोले व टीम चे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.टी.आय पिंपरी चिंचवड चे श्री संतोष गुरव व श्री गोखले यांनी केले.




