हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी सोमाटणे फाटा येथे रुग्णांना फळे ,बिस्किटे वाटप

मावळ मराठा न्यूज़, सोमाटने :- आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांना स्मृतीदिनी सोमाटणे फाटा येथे शिवसेना शाखा कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . मार्गदर्शक श्री.शांताराम भाऊ भोते यांच्या मार्गदर्शनाखाली सोमाटणे फाटा येथील पायोनिर हॉस्पिटल,पवना हॉस्पिटल,बढे हॉस्पिटल,पाटील हॉस्पिटल,साई नर्सिंग होम, येथे रुग्णांना फळे , बिस्किटे वाटप करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, तालुका संघटक शांताराम भोते ,तालुका सल्लागार मारुती खोले, उप तालुका प्रमुख युवराज सुतार, युवाअधिकारीअक्षय साबळे,विभाग प्रमुख उमेश दहिभाते,भरत भोते, उपविभाग प्रमुख समीर कराळे, संदिप झांबरे वाहतूक सेना बाळु शेलार ,माजी सरपंच विश्वास घोटकुले,उद्योजक गणेश कदम,हनुमंत घरदले,शाखा प्रमुख शंकर गोपाळे इत्यादी मान्यवर यांच्या उपस्थितित कार्यक्रम संपन्न झाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page