महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सौ सरिताताई बारणे प्रचारात झाल्या सक्रिय



मावळ मराठा न्युज :- लोणावळा,मावळ लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येते तसा तसा प्रचारात रंगत वाढत आहे. १३ मे रोजी होणाऱ्या मतदान साठी बारणे यांना जास्त जास्त मतदान व्हावे यासाठी सिनेअभिनेता गोविंदा यांचा नुकताच पिंपरी चिंचड येथे रोड शो देखील झाला. मावळ लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सौ सरिताताई बारणे यांच्या उपस्थितीत आज लोणावळा शहरातील महायुतीचे आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या.




