महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचार दौराला लोणावळ्यातील भुशी रामनगर येथील मतदारांचा चांगला प्रतिसाद




मावळ मराठा न्युज :- लोणावळा,मावळ लोकसभा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराच्या सातव्या दिवशी लोणावळा शहरातील पंचशिलनगर,भुशी येथुन भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेऊन जेष्ठ भिमसैनिक भालेराव यांच्या शुभहस्ते प्रचाराचा नारळ वाढवून व मशाल पेटवून सुरूवात करण्यात आली.यावेळेस भुशीगाव रामनगर,भुशी डॅम परीसर,बालग्राम व कृष्णनगर येथे समारोप करण्यात आला.यावेळी नागरीकांच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी घेऊन परीचय पत्रकाचे वाटप करण्यात आले. लोकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला.यावेळेस शिवसेना,कॉग्रेस आय,राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आजी माजी पदाधिकारी नगरसेवक,नगरसेविका,महिला आघाडी,सेवादलच्या महिला पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.




