विद्यार्थ्यांनी पोलीस विभागात नौकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न करावा -विलास कालेकर

लोणावळा. :- सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयातील आजी – माजी विद्यार्थी व पालक यांच्या करिता ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा विषयी व्याख्यान आयोजित केले. सब इन्स्पेकर कांदिवली,मुंबईचे विलास कालेकर यांनी स्वतः कशा प्रकारे संघर्षातून जीवन जगले. याविषयीं सांगितले. पोलीस विभागात चौतीस वर्ष सेवा केल्याचे त्यांनी सांगितले . आपल्यातील गुण ओळखून विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षा द्याव्यात त्यात आपले जीवन घडवावे .त्यातच पोलीस विभागात नौकरीला खुप चांगल्या संध्या आहेत. त्यासाठी आपण मार्गदर्शन घ्यावे असे सांगितले. पोलिस विभागात पुन्न्याचे काम करावे लागते व खुप आदर व सन्मान मिळतो.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी पोलीस विभागात नौकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत . असं ही ते म्हणाले.यावेळी त्यांच्या सोबत विनायक मांढरे एम टी एन एल अधिकारी,विनोद कारेकर ,जयवंत भोसले, संजय मालवणकर प्रमुख पाहुणे व योगेश वाळंज अध्यक्ष शिक्षक पालक संघ.विनायक तोंडे,गणेश दळवी पोलीस पाटील, देवरे सर मुख्याध्यापक उपस्थित होते . संजय कुलथे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page