कामशेत मध्ये पत्रक वाटत महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार जोरात



मावळ मराठा न्युज :-कामशेत महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्री संजोग वाघिरे पाटील यांच्या प्रचारार्थ आज कामशेत मच्छिमार्केट, बाजारपेठ ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, पवनानगर रोड या भागात प्रचार दौरा काढण्यात आलायावेळी मा. ता उपाध्यक्ष संतोष भाऊ राक्षे, शहर अध्यक्ष संतोष भाऊ वीर, युवक अध्यक्ष सुरज भाऊ पुरी, ओबीसी सेलचे अध्यक्ष अभिजित दादा शिनगारे, अल्पसंख्यांक सेलचे मोईन खान, आणि कार्यकर्ते तसेच शिवसेना पक्ष प्रमुख सतीश इंगवले, गणेशजी भोकरे, काँग्रेस पक्षाचे रोहिदास वाळुंज, राजू चितोडिया, कमल चितोडिया, बाबू वाघमारे, आजी माजी शहर प्रमुख उपस्थित होते प्रचार दरम्यान घरोघरी नागरिकांना पत्रक वाटत मतदारांना मशाल या निवडणूक चिन्हाची ओळख करून देण्यात आली.




