अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या लोणावळ्यातील हॉटेल युटोपिया हाय व हॉटेल कुमार रिसॉर्टवर कार्तिक यांची धडक कारवाई;दोन जणांवर गुन्हे,पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. तसेच श्री सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा विभागातील सर्व आस्थापना चालक यांनी त्यांना नेमून दिलेल्या नियमांचे व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे आव्हान केले होते. तरीही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असून लोणावळा शहर पो.स्टे हद्दीतील हॉटेल युटोपिया डाईन हाय व कुमार रिसॉर्ट या हॉटेल्समध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालत असल्याची खात्रीशीर माहिती श्री सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्याआधारे दिनांक १७/०३/२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास श्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह १) हॉटेल यूटोपिया डाईन हाय व २) हॉटेल कुमार रिसॉर्ट, लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे याठिकाणी छापा टाकला असता नमूद हॉटेलचालक हे सदरचे हॉटेलमधेच अवैध हुक्का पार्लर चालवून ग्राहकांना अवैधपणे हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे मिळून आल्याने दोन्ही हॉटेलमधून हुकका पॉट, तंबाखुयुक्त फ्लेवर्स, फिल्टर, पाइप ई. असा एकूण ४८ ,७४० रु./- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पो.स्टे येथे इसम नामे 1)रुस्तम वकील अहमद, वय २२ वर्षे, रा.लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे, व २) रोशन मनोज यादव वय ३० वर्षे, व्यवसाय हाटेल मालक, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुंगार्ली, ता. मावळ, जि.पुणे यांचेविरोधात सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वित्तरण, विनीमय) अधिनियम २००३ चे सुधारित अधिनियम २०१८ चे कलम ४ (अ) व २१ (अ) सह भादवि कलम १८८ , ३४ अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, पोसई शुभम चव्हाण, पोसई रोहन पाटील, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना. सचिन गायकवाड, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अंकुश पवार, पो कॉ गणेश येलवंडे, पो कॉ काळे, पो कॉ टकले, पो कॉ माळवे, पो कॉ पवार, मपोकॉ चवरे, मपोकॉ शिंदे यांचे पथकाने केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page