लोणावळा शहर मनसे तर्फे बदलापूर घटनेच्या संदर्भात शहर निवेदन आणि शाळांना सूचना

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,बदलापूर येथे झालेल्या व महाराष्ट्रात वारंवार घडत असलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष भारत रमेश चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये व लोणावळा शहरातील सर्व शाळा व कॉलेज चे मुख्याध्यापक यांना निवेदन देण्यात आले,व अश्या प्रकारच्या घटना लोणावळा शहरामध्ये घडू नयेत म्हणून लोणावळा पोलिसांना रोज शाळा सुरू होण्याअगोदर व संपल्यानंतर त्या शाळेबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी विनंती केली तसेच सर्व शाळांमध्ये काही नवीन सूचना सुचवण्यात आल्या या संदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशनला व सर्व शाळांना लेखी निवेदन देण्यात आले.अशी घटना लोणावळा शहरामध्ये घडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल अशी ग्वाही लोणावळा शहर पोलिसांनी आणि शाळा व कॉलेज यांनी दिली.यावेळी मनसे उपाध्यक्ष दिनेशकालेकर,निखिल भोसले,अमितजी भोसले,संघटक अभिजित फासगे,विश्रांत साठे,संदीपबोभाटे व आनंद बोभाटे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.शाळा समितीला केलेल्या सूचना१.सर्व शाळा व कॉलेज परिसरात सी सी टी व्ही असणे आवश्यक आहे व सर्व चालू असावेत.२.सर्व शाळा व कॉलेज मध्ये सूचना पेटी आवश्यक असावी व ती रोजच्या रोज पाहून त्या सूचनांचे निराकरण करावे.३.शाळा व कॉलेज मधील सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे चरित्र पडताळणी करून घ्यावे.४.मुलींच्या टॉयलेट जवळ कॅम्पलसरी एक लेडीज असावी.५.विद्यार्थ्यांच्या बद्द्दल काही तक्रारी असतील तर त्यांच्या पालकांना त्वरित कळवावे६.प्रत्येक महिन्याला शाळा व कॉलेज मध्ये पालकांची मीटिंग बोलवावी.७.शाळा व कॉलेज मध्ये गेटवर शिपाई असावा व येणाऱ्या व जाणाऱ्यांची नोंद करावी

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page