नशामुक्ती अभियाना अंतर्गत कामशेत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,५६ लाख ९२ हजार किमतीचा गांजा जप्त,४ जणांवर गुन्हे दाखल



मावळ मराठा न्युज:- कामशेत,दिनांक २२/०८/२०२४ रोजी सकाळी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत ताजे ता. मावळ गावचे हददीतून जुने हायवे रोडकडून ताजे गावाकडे जाणारे रोडमार्गे मळवली, लोणावळाकडे ४ इसम त्यांचे ताब्येतील सिल्हवर रंगाचे वेरना कारमधुन गांजांची वाहतुक करणार असलेची माहीती मिळालेने लागलीच त्यांनी मा. वरीष्ठांना मिळाले बातमीचा आशय सांगुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, लोणावळा विभाग यांचे मार्गदर्शना प्रमाणे दोन पथके तयार करून पंचांचे उपस्थितीमध्ये सापळा लावला. त्यानंतर मिळाले बातमीप्रमाणे एक वेरना कार नंबर एम.एच/१४/जी वाय/०५५० हि जुने हायवे रोड ने ताजे गावाकडे आलेली दिसली त्यावेळी सापळा कारवाई साठी तयार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे छापा घालून कारची व डिकीची पाहणी केली असता डिकीमध्ये एकूण ९८ किलो वजनाचा गांजा हा आंमलीपदार्थ मिळून आला सदर कार मधील १) अभिषेक अनिल नागवडे, वय २४, २) प्रदिप नारायण नामदास, वय २५ वर्षे, ३) योगेश रमेशलगड, वय ३२ वर्षे, ४) वैभव संजीवण्न चेडे, वय २३ वर्षे, सर्व रा.पी.एम.टी. स्टॉप जवळील, मराठी शाळे जवळ, कारेगांव ता. शिरूर जि.पुणे यांना गांजा बाळगले बददल ताब्येत घेवून छाप्यामध्ये मिळून आलेला एकूण ९८ किलो वजनांचा गांजा एकूण ४८ लाख ५० हजार रूपये किंमतीचा गांजा तसेच ८ लाख रूपये किंमतीची वेरना कार, ४२ हजार रूपये किंमतीचे ३ मोबाईल हँडसेट असे एकूण ५६ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल मिळून आले.तो पंचा समक्ष जप्त केला आहे. त्यावरून सदर इसंमांवर कामशेत पोलीस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८ (क) २० (क) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, श्री. पंकज देशमुख साो, अपर पोलीस अधिक्षक, श्री. रमेश चोपडे साो, सहा. पोलीस अधिक्षक श्री सत्यसाई कार्तिक सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र पाटील, तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. फौजदार नितेश कदम, पोलीस अंमलदर. रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित,समिर करे,रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी कारवाई केली.हे प्रकरण अमली पदार्थांचे व्यसन आणि अंमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी लोणावळ्यात सुरू करण्यात आलेल्या संकल्प नाशमुक्ती अभियानाचा एक भाग आहे. गेल्या एका वर्षात संकल्प नशा मुक्ती अभियानाचा एक भाग म्हणून,१०२ जणांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत ७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजपर्यंत १ कोटी ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी मावळात नशामुक्ती अभियान राबवून तरुणांना नशामुक्ती यापासून लांब ठेवण्याचा संकल्प केला आहे.




