विनय कुलकर्णी यांना विद्यापीठातर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान

मावळ मराठा न्यूज:- (प्रतिनिधी)आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलनातील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राध्यापक डॉ. विनय कुलकर्णी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा यंदाचा व्यवसायिक अभ्यासक्रम शहरी विभागातील “ उत्कृष्ट शिक्षक”पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७४ वर्धापन दिनाच्या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे याच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी संकुलाचे संचालक रियर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) , संकुलाचे मुख्य वित्त अधिकारी बिपिनबिहारी शर्मा, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मालती उप प्राचार्य डॉ. संदीप सरनौबत, यांत्रिकीअभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डाॅ प्रविण नितनवरे, डिन प्रशांत भालेराव आदी उपस्थित होते.या पुरस्कारासाठी शिक्षकाचा शैक्षणिक तथा संशोधन क्षेत्रातील योगदान ग्राह्य धरले जाते. डॉ. विनय कुलकर्णी हे मागील 21 वर्षापासून अध्यापनाचे काम करतात व त्यांच्या या कारकिर्दीत त्यांनी नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धती अमलात आणून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करण्यास मदत करेल याकडे लक्ष केंद्रित केले. यामुळे विद्यार्थ्यांना विषयातील मूलभूत संकल्पना आत्मसात करण्यास मोलाची मदत होत आहे. विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञानाचे आकलन करण्यासाठी सुद्धा नावीन्यपूर्ण पद्धती अमलात आणल्या व अशा केस स्टडीज विविध शोध निबंधातून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध केल्या. डॉ. विनय कुलकर्णी यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती संदर्भात विविध कार्यशाळेत व्याख्याने देऊन हा अभिनव उपक्रम सर्वदूर पोहचविला आहे. हा पुरस्कार त्यांना मिळणे म्हणजे त्यांच्या या नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण अध्यापनावर शिक्कामोर्तब केल्यासारखे आहे. या यशासाठी त्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पी . मालती, उप प्राचार्य डॉ. संदीप सरनौबत व संकुलाचे संचालक रियर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांचे मार्गदर्शन लाभले.आकुर्डी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा. सतेज पाटील विश्वस्त मा. तेजस पाटील यांनी डॉ. कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page