पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबारात मावळ तालुक्यातील शहीदाना शिवसेना मावळच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली


मावळ मराठा न्यूज़ :-मावळ पवनामाईच्या रक्षणार्थ ९ ऑगस्ट २०११ रोजी पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलन विरोधात पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबारात मावळ तालुक्यातील शहीद झालेले शेतकरी बांधवशहीद कांताबाई ठाकर, शहीद मोरेश्वर साठे, शहीद शामराव तुपे यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने पवन मावळ येथील येळसे गावातील स्मृती स्थळावर अभिवादन व भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आलीयावेळी शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ व मावळ तालुका संघटक अमित कुंभार यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, अजूनही आंदोलनातील शेतकरी बांधव १२ वर्षे उलटून ही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत यावेळी तालुका शिवसेनेच्या वतीने सामुहिक श्रद्धांजली अर्पण न करता राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत पक्षाच्या वतीने वैयक्तिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीयावेळी स्मृती स्थळावर अभिवादन करताना शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, तालुका संघटक अमित कुंभार, तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, उपतालुकाप्रमुख किसन भाऊ तरस, विभाग प्रमुख युवराज सुतार, विभाग प्रमुख उमेश दहिभाते,थुगाव सरपंच प्रकाश सावंत, युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, विभाग अधिकारी अक्षय येळवंडे, बाळासाहेब शिंदे,भरत भोते , शाखाप्रमुख किशोर शिर्के, शंकर दळवी, अतुल केंडे, विकास कालेकर, छबन काळे व सर्व शिवसेना मावळ तालुका पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वडगाव मावळ येथील निष्ठावान व कडवट शिवसैनिक श्री बाळासाहेब शिंदे हे गेली १२ वर्षे स्मृती स्थळावर वडगाव ते पवनानगर पायी शहीद आंदोलकांना श्रद्धांजली अर्पण करण्यास येत असतात बाळासाहेब शिंदे यांनीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे




