डोंगरगावच्या गरजवंत महिलांना युथ विथ मिशन अंतर्गत सुनील येवले यांच्या माध्यमातून मोफत आठ शिलाई मशीन वाटप





मावळ मराठा न्युज :-डोंगरगाव,आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील महिला भगिनी यांच्या हाताला काम मिळावे या सामाजिक हेतूने डोंगरगावचे कार्यसम्राट सरपंच श्री सुनील बाळकृष्ण येवले यांनी गावातील गरजवंत महिला यांना शिवण क्लास प्रशिक्षण साठी जागा उपलब्ध करून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे यासाठी आशा सेवा संस्था खंडाळा,राफा शिवन क्लासेस यांच्या मार्फत आणि सहकार्यातून डोंगरगाववाडी येथे गेली ६ महिने शिवण क्लासेस घेण्यात आले. त्यामध्ये गावातील ८ गरजवंत महिला भगिनींना सरपंच श्री सुनील येवले यांच्या शिफारसी वरून आशा सेवा संस्था यांच्या वतीने युथ विथ मिशन अंतर्गत महिला सबलीकरणसाठी नुकतेच मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.यावेळी क्लासच्या गरजवंत महिला,डोंगरगावचे सरपंच श्री सुनील बाळकृष्ण येवले,प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक बाल्ली ग्रोव्हर उर्फ बी जी उपस्थित होते.