शिवदुर्ग रेस्कु टिमने कुरवंडे गाव येथील योगेश पालवे या तरुणाचा मृतदेह काढला बाहेर

मावळ मराठा न्युज लोणावळा,दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ .३० वाजता योगेश पालवे वय कुरवंडे गाव येथील तरुणाचा वलवण डँम, ठाकरवाडी,बाळू मामा मंदिराच्या खालच्या बाजूला बुडून मृत्यू झाला असावा असा संशय होता. काल रात्री लोणावळा शहृर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आज सकाळी ९ .०० वाजता घटनास्थळी पोचलो. साहित्याची तयारी केली. कुठे घटना घडली ते समजून घेतले. महेश भाऊ मसने स्कूबा किट घालून पाण्यात गेले. योगेशदादा दळवी यांनी बीलेचा रोप घेतला. अर्धा पाऊन तास शोधमोहीम चालू होती. अखेर शोधकार्याला यश आले मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून पोलीसांकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आला.सदर झालेल्या रेस्क्यू टीम मध्ये आनंद गावडे, राजेंद्र कडू, मयूर दळवी, दीपक भोरडे, मनोहर ढाकोळ,सागर दळवी, सागर कुंभार,सतीश सगर,नितीन सांगळे,शाम वाल्मिकी, राजेश भालेराव,प्रकाश रत्नाकर,योगेश दळवी, अदिती गायकवाड, स्वप्निल काटे,महेश मसणे, सुनील गायकवाड यांचा समावेश होता. शिवदुर्ग रेस्कु टिम हेल्पलाईन नंबर ९८२२५००८८४ ८३०८२९६६५५

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page