आषाढी वारी,सेवा निरपेक्ष सेवा, स्वयंस्फूर्तीने केलेली सेवा,त्यातून मिळालेला,मिळवलेल्या आनंदाची तुलनाच नाही – संतोष गुरव



मावळ मराठा न्युज :- दि.३/०७/२४ सेवा…..निरपेक्ष सेवा…. स्वयंस्फूर्तीने केलेली सेवा.. त्यातून मिळालेला, मिळवलेल्या आनंदाची तुलनाच होवू शकत नाही.त्यातही ती सेवा पांडुरंग चरणी अर्पण करायची संधी मिळते तेव्हा मग तिचे स्वरूप कोणतेही असो कष्टाची,सोय-गैरसोय याची पर्वाच केली जात नाही.आता या दृष्यातच बघा…एरवी रांधा,वाढा, उष्टी काढा या सगळ्यांचा तेच ते काम करून स्त्रीयांना किती कंटाळा येतो पण येथे तेच काम विठूरायाची सेवा म्हणून करताना मिळणारा आनंदच वेगळा.त्यासाठी मग लागत नाही सुसज्ज स्वयंपाकघर…स्वाॉरी …आपल्या मराठीत किचन… किचन कट्टा वा तत्सम सुखसोयी…तर लागतो तो फक्त सेवाभाव…मग रस्त्यावर,मातीत,चिखलात जिथे मिळेल ती जागा,विसाव्या चे ठिकाण चालतं.मिळेल ते इंधन…चालून आलेला थकवा बाजूला सारून पदर खोवत माता भगिनी आपलं वय,मान-मरातब,दुखणी-खुपणी सगळं विसरून अन्नपुर्णेच्या भुकेत जातात.मिळेल त्या सामुग्रीत रुचकर स्वयंपाक तयार होतो.पहिला घास पांडुरंग चरणी अर्पण होतो आणि वदनी कवळ घेता च्या स्वरात … उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ची आहुती सुरु होते..ओठी,पोटी नांदतो तो परमानंदस्वरुपी परमात्मा परब्रह्म पांडुरंग..रामकृष्ण हरी..




