डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालायाचा माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर भव्य दिव्य महामेळावा संपन्न



मावळ मराठा न्यूज़ :-लोणावळा – डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालायाचा माजी विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर महामेळावा नुकताच रविवार दिनांक १९/११/२०२३ रोजी शाळेच्या प्रांगणात भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. सरस्वती मातेच्या दीप प्रज्वलिताने कार्यक्रमाची सुरवात माजी मुख्या द्यापक गुरुवर्य दि. सी. पाटील यांच्या हस्ते झाली ह्यावेळी गुरुवर्य दि. सी. पाटील यांचा भव्य सत्कार माजी विद्यार्थी प्रसिद्ध डेंटल सर्जन डॉक्टर सुनील जाधव आणि मराठी सिनेमा दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीफळ, शाळा आणि शाळेचे स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. गुरुवर्य व्हि. एन. जोशी ह्यांचा सत्कार माजी विध्यार्थी अरुण लाड आणि सोपान ठाकर ह्यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावरील सर्व शिक्षकांचा सत्कार माजी विध्यार्थी तर्फे करण्यात आला. गुरुवर्य दि. सी. पाटील आणि जोशी यांचे मार्गदर्शन वर भाषणे झाली. अनेक विध्यार्थ्यानी आपली शिक्षक आणि शाळेविषयी मनोगते व्यक्त केली..आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर. सुनील जाधव म्हणाले, ह्या शाळेमुळे आणि आदर्श शिक्षकांमुळेच मी डॉक्टर झालो आणि त्यामुळेच ह्या व्यासपीठावर उभा आहे. आई आणि शाळा ह्या दोन्हीवर माझे सारखेच प्रेम आहे. ह्या वेळी माजी शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महामेळावा यशस्वी करण्याकरीता प्रामुख्याने माजी विध्यार्थी आनंद गावडे, आशिष मेहता, ऋषिकेश लेंडघर, संतोष तोंडिळकर, सागर तावरे, निरंजन कांबळे, शिल्पा कोपरकर, सौं पानसे, सौं कांबळे, सिंधू जाधव अशा अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले.




