सत्पात्री दान करणारे नायडू कुटुंबियांकडून वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला बोटीचे सुझुकी कंपनीचे इंजिन भेट



मावळ मराठा न्युज:- तळेगाव दाभाडे, (डॉ. प्रमोद बोराडे) वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची महत्वाची अडचण दूर करण्यासाठी त्यांना मोठ्या मोलाची भेट निरपेक्ष भूमिकेतून श्री. रमाकांत नायडू व त्यांच्या सौभाग्यवती सौ. इंद्रायणी नायडू यांनी दिली. भेट म्हणजे मोठी किंमती तसेंच वन्यजीव रक्षक संस्थेच्या सर्व समाजप्रेमी मंडळींचा वेग वाढविणारी अर्थात बोटीचे सुझुकी कंपनीचे इंजिन ही होय… आजवर श्री. निलेश गराडे व त्यांच्या सहकारी मंडळींनी जी समाजसेवा केली तिच अखंडित व अविरत गतिशील राहो यासाठी ही भेट तत्व हॉटेल मध्ये दिली गेली. सदर कार्यक्रमाचे नियोजन जागरूक वाचक कट्टा यांनी केले होते. या कट्ट्याचे कुटुंब प्रमुख श्री. गणेशजी बोरुडे हे कायम समाजाभिमुख राहून त्यांच्या मदतीला धवणारे व्यक्तिमत्व. तसेंच त्यांच्या सोबत श्री. दिलीपजी डोळस व सर्व सहकारी. या सर्वांनी मिळून कार्यक्रम एकदम उंचीवर नेऊन ठेवला. मनःपूर्वक सांगावे वाटते की अनेक मंडळी म्हणतात काय वोट्सअप वर वेळ घालवतोय किंवा काय फायदा या मेडिया वा गॅझेटचा ? मात्र काल खरेच हे जाणवले की प्रत्येक गोष्टीत सकारात्मक बाजू असते मात्र ती शोधावी लागते. पंडित श्री. सुरेशजी सखोलकर आणी डॉ. अनंत परांजपे यांसारिखे धुरीन मंडळी देखील या सोहळ्यास उपस्थित झाली हे खूप बरे झाले.एखादा समाज प्रगल्भ कसा म्हणावा याचे उत्तर काल झालेल्या या सोहळ्यात दिसून येते. सर्वांनी आपापल्या परीने या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले तसेंच पोलीस प्रशासनाने देखील त्यांचे अनुभव व संभाव्य अडचणी सांगितल्या. बहुसंख्येने पत्रकार बंधू-भगिनी देखील उपस्थित असल्याने या दानशूर व्यक्तिमत्वाकडून अन्य कित्येक श्रीमंत मंडळींनी खूप काही शिकण्यासारखे आहे हे देखील येथे अधोरेखित झाले. अखेर अल्प स्वल्प माझे मत मांडतो : निलेशभाऊ, माळी मामा, जिगर सोलंकी, निनाद काकडे, शुभम काकडे, गणेश निसाळ, सर्जेस पाटील या सर्वांच्या कामाचे कौतुक – आभार कायम होत राहील कारण अडल्या नडल्या मंडळीना फक्त हिच हक्काची माणसे असतात मात्र यांच्या मागे यांचे कुटुंब अर्थात सर्वांच्या पत्नी यांचे विशेष कौतुक व धन्यवाद द्यावे असे मला वाटते. निलेशभाऊंच्या मागे खंबीरपणे नेहाताई उभ्या आहेत. तसेंच सर्व या वरील मंडळींच्या मागे त्यांच्या पत्नी जे त्यांना सहकार्य करीत आहेत ते लाख मोलाचें आहे. जागरूक वाचक कट्टा माध्यमातून पूर्ण झालेल्या या उत्कृष्ठ अशा सोहळ्यात समाजात थोर कार्य करणाऱ्या माणसांच्या मागे भक्कम माणसं उभी राहिली पाहिजे हा आदर्श आपल्या समूहाने घालून दिला असून या समूहाचा आदर्श सर्वांनी घेणे अभिप्रेत आहे.




