लोणावळ्यातील संविधान गौरव समारंभ”सोहळा ने देशाला घडवले खरं राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन,सर्व धर्मीय धर्मगुरू एकाच व्यासपीठावर



मावळ मराठा न्युज -लोणावळा,भारत देशाच्या संविधानाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहे. भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये शासकीय पातळीवर संविधान जनजागृतीचे विविध उपक्रमांन्वये कार्यक्रम राबवले जात असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव व माजी नगराध्यक्ष लोणावळा नगरपरिषद सूर्यकांत वाघमारे यांच्या संकल्पनेतून सर्व जातीय, धर्मीय,सर्वपक्षीय सर्व संघटनांना एकत्र घेऊन लोणावळ्यातीलप्रसिद्ध आर्किटेक्ट दत्तात्रेय येवले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी “संविधान गौरव समारंभ”सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मावळा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी भव्य संविधान रॅली मिरवणूक काढण्यात आली. भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाले असल्याने भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष निमित्त भारतीय संविधानाची भव्य प्रतिमा,देशाचे संविधान भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान पंडितजवाहरलाल नेहरू यांना प्रदान करणारा फोटो हे संविधान गौरव रॅलीचे मुख्य आकर्षण होते. रॅली नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी सर्व राष्ट्रपुरुषांना पुष्पहार अर्पण करुन संविधान गौरव सोहळा प्रारंभ झाला. यावेळी सर्व धर्मगुरु यांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व धर्म गुरु आणि संविधान गौरव समितीच्या पदाधिकारी यांनी डॉ बाबासाहेब यांच्या संविधानाने सर्व धार्मियांना एकत्र बांधून ठेवले आहे त्यामुळे भारताचे संविधान जगात सर्वोत्तम असे संविधान असल्याचा उल्लेख सर्ववक्त्यांनी केला. संविधान गौरव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय येवले यांनी लोणावळा येथील संविधान गौरव समारंभ हा देशात प्रथम होतों आहे त्यामुळे जनतेला दिशा आणि ऊर्जा देणारा असा हा कार्यक्रम असल्याचे सांगितले. यावेळी विविध सामाजिक संघटना,विविध धर्मातील मान्यवारांना भारतीय संविधानाच्या ७५ प्रतींचे वितरण करण्यात आले. संविधान गौरव समारंभामुळे सर्व धर्म समभाव चे राज्याला दर्शन लोणावळ्याच्या ह्या कार्यक्रमाने घडवले असल्याचे या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले. सर्व पक्षीय अध्यक्ष यात नासिरभाई शेख,मौलाना अजीज उल्ला खान,कुरेश रामपूरवाला, देविदास कडू,अरुण लाड,विलास बडेकर,संजय भोईर,प्रतिभा खळदकर,सुधीर राईलकर,आनंद गावडे,भिखू विरत्न महाथेरू,यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्तविक निखिल कवीश्वर यांनी केले.सूत्रसंचालन बापूलाल तारे यांनी तर आभार कमलशील म्हस्के यांनी मानले.या रॅलीत माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव सह सर्व पक्षीय नागरिकांनी हजेरी लावली.रॅलीत शहरातील शाळा, विविध शासकीय कार्यालय,क्लब, विविध संस्था आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.




