हीलींग हँड्स फाउंडेशन आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्र दारुम्बरे , मॉन्डेलिझ इंडिया फुड्स प्रा. लि.बाल रक्षा भारत यांच्या संयुक्त विध्यमाने आरोग्य तपासणी शिबिर

मावळ मराठा न्यूज़,प्रतिनिधि :- आज च्या धकाधकीच्या जीवनशैली आणि आहार यामुळे लोकांना असेकाही आजारांना तोंड द्यावं लागतं की हे आजार कुणाला लवकर सांगता ही येत नाही आणि लपवता ही येत नाही. दिनांक १३/९/२०२३ रोजी, हीलींग हँड्स फाउंडेशन आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्र दारुम्बरे , मॉन्डेलिझ इंडिया फुड्स प्रा. लि.बाल रक्षा भारत (सेव द चिल्ड्रन ) यांच्या संयुक्त विध्यमाने मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकारावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.हिलींग हँडस फाउंडेशन डॉ अश्विनी परगेवार यांनी पेशंट तपासणी केली आहार कसा असावा यावर यांनी मार्गदर्शन केले,आणि औषध वाटप केले.आनंद मिसाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबीर सकाळी ११ ते २ या दरम्यान घेण्यात आले, सदर शिबिरात ६९ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र दारुम्ब्रे कडून डॉ प्रिन्सि डेव्हिड(मेडिकल ऑफिसर)केतन जाधव(Mpw),मोंडेलिझ इंडिया प्रा लि.सेव्ह द चिल्डन बाल रक्षा भारत कडून पूनम गायकवाड(समुपदेशक),रवींद्र ठाकरे(समुपदेशक),आशा वर्कर वैशाली बळवंत वाल्हेकर,गायत्री संतोष जाधव(आशा वर्कर) यांचे मोलाचे सहकार्य लाभले,सरपंच उमेश आगळे यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले, सौ.अनिता सैद (शिबीर व कार्यक्रम व्यवस्थापक)यांनी शिबिराचे पूर्ण नियोजन केले, सौ मधुरा भाटे (संस्था समनव्यक),ह्या आजरांविषयी योग्य माहिती व मार्गदर्शन गावोगावी पोहोचवण्याचा डॉ अश्विन पोरवाल (अध्यक्ष, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन )डॉ स्नेहल पोरवाल(सेक्रेटरी हींलिंग हॅन्डसफाउंडेशन) यांचा प्रयत्न.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page