प्रतिबंधीत हुक्का, हुक्का फ्लेवर तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणा-या दोघांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची धड़क कारवाई

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,लोणावळा ग्रामीण पोलीसांची जिल्हाधिकारी पुणे यांनी पर्यटनांच्या अनुषंगाने पारित केलेल्या नियमावली आदेशांचे उल्लंघन करणा-या तसेच प्रतिबंधीत हुक्का, हुक्का फ्लेवर तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणा-या इसमांवर धड़क कारवाई लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन २१८/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २२३ व सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणीज्य व उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय) अधिनियम २००३ चे सुधारीत अधिनियम २०१८ चे कलम ४ (अ) व २१ (अ)पुणे ग्रामीण पोलीस जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, मा. श्री. पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्हयातील अवैध धंदयांवर परीणामकारक कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन व निर्दालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रामध्ये चोरून/छुप्या रितीने अवैध व्यवसाय करणा-यांवर लोणावळा ग्रामीण पोलीसांकडुन श्री. पंकज देशमुख , पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, श्री. रमेश चोपडे , अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण व श्री. सत्यसाई कार्तीक, सहा. पोलीस अधीक्षक, तथा उप विभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग, लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये छुप्यारितीने अवैध व्यवसाय करणा-या अवैध व्यवसायीकांवर परीणामकारक कारवाई करण्यात आली .दि.६/७/२०२४ राजी १७/४५ वा. चे सुमारास मौजे आतवण गावचे हद्दीत टायगर पॉईट येथे मंगेश स्नॅक्स सेंटर या दुकानामध्ये, ता. मावळ, जि. पुणे येथे इसम नामे १) मंगेश नंदु कराळे वय २५ वर्षे रा. खंडाळा ता. मावळ जि. पुणे. व २) राकेश गणपत बारे २५ वर्षे रा. खोपोली. ता. खालापुर जि. रायगड हे आपले ताब्यातील मंगेश स्नॅक्स सेंटर येथे सार्वजनिक टिकाणी सार्वजनिक रित्या मानवी जिवीतास धोका निर्माण होणाऱ्या व शासनाने बंदी घातलेले १) एक हुका पिण्याचा काचेचा पॉट पाईपसह किं.रू. २००० /-, २) हुक्का पिणेसाठी वापरण्यात येणारे रॉयल स्मोकींग कंपनीचे मंगाईपान फ्लेवरचे १ फ्फैंट किं. रू. १०० /-, ३)हुक्का पिणेसाठी वापरण्यात येणारे रॉयल स्मोकींग कंपनीचे किवी ब्लास्ट फ्लेवरचे २ पाकेट किं. रू. २०० /-, ४) हुक्का पिणेसाठी वापरण्यात येणारे अब्जल कंपनीचे डबल अॅपल फ्लेवरचे 1 पॅकेट किं.रू. १०० /- व ५) हुक्का पिणेसाठी वापरण्यात येणारे अब्जल कंपनीचे औरज फ्लेवरचे १ पॅकेट किं.रू. १०० /- असा एकुण २५०० /- रूपयांचे साहित्य आपले कब्जात बाळगलेले असत्ताना जागीच मिळून आले असुन त्यांनी मा. जिल्हाधिकारी सो पुणे याचेकडील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जा.क्र. पगक कावि २६९७/२०२४ दि. ०२/०७/२०२४ अन्वये लागु असलेल्या उपाययोजना करीता पारीत झालेल्या आदेशाचे उल्लंघन केले. म्हणुन त्यांचे विरुध्द फिर्यादी वेदीका रामराव शिर्षे वय ३२ व्यवसाय वनरक्षक, वडगांव मावळ, रा. महालक्ष्मी मंदीर केशवनगर वडगाव मावळ, ता. मावळ जि. पुणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने ‘भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २२३ व सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणीज्य व उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय) अधिनियम २००३ चे सुधारीत अधिनियम २०१८ चे कलम ४ (अ) २१ (अ) प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पालीस हवालदार गाल बक्कल नंबर १९९० लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदर कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीणचे श्री. पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीणचे श्री. रमेश चोपडे,सहा. पोलीस अधीक्षक तथा लोणावळा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी,आय पीएस श्री. सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, जय पवार पो.हवा. ब.नं. १९८२, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन,सिध्देश्वर शिंदे पो. कॉ. ब.नं. १९४८, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page