सुनील शेळके यांनी शक्ती प्रदर्शन करत केला अर्ज दाखल,मावळ विधानसभा मतदार संघात मावळ भाजपचा बापूसाहेब भेगडे यांना जाहीर पाठिंबा

मावळ मराठा न्युज :- मावळ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ विधानसभेची महायुती ची उमेदवारी आमदार सुनील शेळके यांना जाहीर होताच मावळमध्ये मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला,मावळ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा पत्रकार परिषद घेऊन दिला असून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी च्या नेत्यांचा दोन गट पडले एक गट विद्यमान आमदार सुनील शेळके यांना मानणारा तर दुसरा मावळ तालुक्यावर आपली पकड सुरुवातीपासून घट्ट ठेवलेले बापू भेगडे यांना मानणारा गट. तर भाजप संपूर्णच पक्षाने आणि त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी यांनी राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवणारे बापू भेगडे यांना निवडून आणण्यासाठी एकवटला असून भाजप पक्षच या निवडणुकीत मिस्टर इंडिया सारखा अदृश्य होणार आहे. त्याच प्रमाणे भाजप चे विधानसभा निवडणूक अधिकारी म्हणून ज्यांनी “आता जनता सांगेल तसं” चे संपूर्ण मावळ तालुक्यात बॅनरबाजी करत महायुती कडून तिकिटाची वाट बघत असलेले रवींद्र भेगडे यांना पुन्हा एकदा आपल्या उमेदवारी मागे घेऊन नामुश्किची पाळी आली आहे. त्यामुळे ते माजी आमदार बाळा भेगडे यांनी घेतलेल्या भाजपाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ते भाजपला किती सहकार्य करतील हा एक चिंतनाचा विषय आहे. विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आज दणक्यात शक्ती प्रदर्शन करुन विरोधी पक्षाला आणि त्यांच्या विरोधकांना तुम्ही कितीही प्रयत्न करा मावळची जनता माझ्या पाठीशी आहे हे आज दाखवून दिले आहे. आता बापू भेगडे देखील २८ तारखेला शक्ती प्रदर्शन करुन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र बापू भेगडे यांचे यश हे महाविकास आघाडी किती सहकार्य करतील यावर अवलंबून आहे. काल बुधवारी दुपारी आमदार सुनील शेळके यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सायंकाळी चार वाजता बापू भेगडे यांनी तळेगाव येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. बापू भेगडे म्हणाले, १९९९ पासून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून निष्ठेने काम करत आहे. त्यापूर्वी आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत होतो. यावर्षी मी मावळ विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. तशी इच्छा देखील मी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे नेते अजितदादा पवार यांना भेटून व्यक्त केली होती व त्या दृष्टीने तयारी देखील सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र एक वेळ संधी द्या म्हणणाऱ्याला पक्षाने पुन्हा दुसऱ्यांना संधी दिली. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे. त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून अपक्ष निवडणूक लढवणार आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मावळ विधानसभाचे सर्व चित्र स्पष्ट होइल.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page