देवघर येथे विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर संपन्न

मावळ मराठा न्यूज :- देवघर गावातील स्वर्गीय वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. विजन स्प्रिंग व बजाज फेनशिव संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरासाठी शिबिर प्रमुख राम पोले, डॉ. प्रवीण सोलंकी, कौन्सिलर शंकर तारपे, कार्तिक कोठोडे ,सुरेश पिंगळे ,यांनी विद्यालयात १८० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. सदर तपासणीत ४५ टक्के विद्यार्थ्यांना नेत्रदोष आढळून आला . सदर विद्यार्थ्यांना व्हिजन स्प्रिंग संस्थेतर्फे चष्मे तयार करून वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी पाटील ,मनीषा ठीकेकर, भगवंत क्षीरसागर,विजय कचरे विजय गायकवाड, सुभाष भानुसघरे,सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page