गेवराई तालुक्यातील चोपडेचीवाडी या गावांमध्ये मातंग समाजातील महिलेला मारहाण करणाऱ्या समाजकंटकाचा जाहीर निषेध-मंगेश डाखोरे



मावळ मराठा न्युज :-पिंपरी – प्रतिनिधी, गेवराई तालुक्यातील “चोपडेची वाडी” या गावामध्ये शुल्लक कारणावरून जातीय गावगुंड विठ्ठल आसाराम चोपडे यांने मातंग समाजातील महिला मनिषा पिंगळे यांना घरात घुसून बेदम मारहाण केली. या निंदनीय कृत्याचा सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जाहीर निषेध करून मंगेश डाखोरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले सदरची घटना दिनांक १०/३/२०२४ रोजी चार वाजण्याच्या दरम्यान घडली होती,परंतु सदर घटना गंभीर असून देखील गावातील सरपंच व इतर जातीवादी लोकांनी सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे.ही अत्यंत गंभीर बाब असुन त्यांना यामध्ये सरपंच व यांचे साथीदार यांना सहआरोपी करून कडक कारवाई करण्यात यावी कारण पिडीत कुटुंबाला तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला जावु नको असे धमकावले व साथीदारांच्या मदतीने नजर कैदेत ठेवले म्हणून आम्ही वरील गुन्हेगारांना मदत करणार्या समाज कंटकावर सह आरोपी करण्याची मागणी करीत आहोत.तसेच पिडीत कुटुंबीय तलावडे पोलिस स्टेशनला गेले असता तक्रार दाखल करून घेण्यास विलंब करणार्या पोलिस कर्मचारी यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात यावी व पिडीत कुटुंबीय पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यासाठी गेले तेव्हा तेथील कामावरील पोलिस कर्मचारी व पी आय यांचे फोन कॉल ( सिडीआर) कलम १२० अ, १२० ब प्रमाने तपासण्यात यावे अशी मागणी सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. सदर घटनेची व्हिडिओ रेकॉर्डिंग पीडित महिलेच्या मुलीने केला तो पुरावा ग्राह्य धरून घटला जलद गतीने चालू करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी.पिडीत महिला भगिनीला पोलिस संरक्षण देऊन भयभीत झालेल्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी आम्ही सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर समन्वयक प्रमुख डी पी खंडाळे, पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, प्रदेश समन्वयक युवराज दाखले, सतिश भवाळ,रामदास कांबळे,आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष आण्णासाहेब कसबे,राजु चव्हाण, आबासाहेब मांढरे, कैलास पाटोळे,मंगेश डाखोरे, अनिल तांबे, सविताताई आव्हाड, मिराताई अल्लाट, संगीताताई जाधव,आदी समाज बांधव यांनी पीडितांच्या पुनर्वसनाची मागणी केली.




