मळ्याळी असोसिएशनचे अध्यक्ष एस बी पिल्ले समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

मावळ मराठा न्युज :-पिंपरी, (प्रतिनिधी ) इंद्रायणी नगर येथील अट्टुक्कल भगवती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि मळ्याळी असोसिएशनचे अध्यक्ष एस. बी. पिल्ले यांना समाज रत्न पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले . हा पुरस्कार प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलच्या ४२ व्या स्थापना दिनाच्या उत्सवात कै लांडगे नात्यागृहात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास मराठी चित्रपट अभिनेता स्वप्निल जोशी, आशीष अग्रवाल, अभिनेत्री नेहा खान , नम्रता गायकवाड, स्थायी समिती माजी सभापती विलास मडिगेरी यांची उपस्थिती लाभली होती.या उत्सवात एस. बी. पिल्ले यांनी केलेल्या समाजासाठी महत्वपूर्ण कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. सेवाभाव आणि समर्पण यांच्या मूल्यांना अधोरेखित करण्यात आले. अशा प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अधिक भव्य आणि संस्मरणीय बनला. कोरोना काळात पिल्ले यांनी सुमारे ७५० नागरिकांना रोज अन्नदान केले. तसेच कोकणात झालेल्या पुरग्रस्ताना कपडे अन्नाधान्य संकलित करून पाठवलेत. आगामी काळात अजूनही समाजाच्या उन्नतीसाठी अखंड कार्य करण्याचा पिल्ले यांची संकल्प केला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page