मुळाशीतील सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे शाळेचा ८ वी ते १० वी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक

मावळ मराठा न्युज -आंबवणे,पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे आयोजित शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ करिता टप्पा २ “शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान ” राबवण्याचे नियोजन सुरु आहे.मा. डॉ भाऊसाहेब कारेकर माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे. यांच्या कल्पनेतून व मुख्याध्यापक संघ पुणे यांच्या मदतीने प्रथम तालुका तपासणी चे प्रभावी नियोजन केले. मुळशी तालुक्यातील इयत्ता ८ वी ते १० वी च्या माध्यमिक शाळाच्या तालुका तपासणी मध्ये आमच्या सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयास प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता.त्यास्तव आज जिल्हा स्तरीय तपासणी पथकात विमल बाई गरवारे विद्यालयाचे मुख्याध्यापक पथक प्रमुख मा. रोहिदास भारमळ, विद्यापीठ हायस्कुल चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. विष्णू मोरे, महाराष्ट्र विद्यालय सदाशिव पेठ पुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. विष्णुदास गावडे, ज्ञानदा हायस्कुल पुणे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. विठ्ठल शिंदे, आयडियल इंग्लिश स्कुल पुणे च्या मुख्याध्यापिका मा. सुनीता शिंदे मान्यवर तपासणी साठी हजर होते.शालेय इमारत, परिपाठ, विद्यार्थी संवाद, उपक्रम पहाणी, शालेय अभिलेख्याची पाहणी करण्यात आली. विविध नावीन्य पूर्ण व विशेष उपक्रमाची तपासणी करताना वाळंज विद्यालयाचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. गोरगरीब जनतेच्या मुलांना उत्तम ज्ञानदानाचे पवित्र कार्य शिक्षक करत आहेत त्या बद्दल पथक प्रमुख मा. रोहिदास भारमळ यांनी कौतुक केले. सुरवातीला मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मा. डॉ भाऊसाहेब कारेकर यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या या गुणवत्ता अभियानातून अनेक बाबी नव्याने शिकायला मिळतात व आपल्या शाळेतील उनिवा पूर्ण करण्यास अनुभवी मार्गदर्शकाकडून मदत होत असते असें मत शाळेचे मुख्याध्यापक श्री भटू देवरे यांनी व्यक्त केले. दुर्गम भागातील शाळेने सर्वच भौतिक सुविधा पूर्ण केल्या आहेत.त्यासाठी संस्थापक अध्यक्ष मा नंदकुमार वाळंज यांचे मार्गदर्शन व सहकार्य खूप मोठे आहे असें मत सर्वं शिक्षकांनी व्यक्त केले.शाळा तपासणी साठी शिक्षक व कर्मचारी यांनी सर्व सोपस्कार पूर्ण केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page