लोणावळ्यातील निस्पृह अविवरत सेवा करणारी आधार फौंडेशन,गरीब होतकरु विद्यार्थांना शालेय साहित्य, गुणवंतांचा




सन्मान मावळ मराठा न्युज :- लोणावळा आधार फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गरजु महिलांना गेली ५ वर्षे दरमहा संपूर्ण किराणा वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपत आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व लोणावळ्यातील दहावी,बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच डॉ बी एन पुरंदरे हायस्कूल लोणावळा ह्याठिकाणी करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आले .कार्यक्रमाची प्रस्तावना व आधार फाऊंडेशन संस्थेच्या कार्याची माहिती रश्मी शिरसकर यांनी केली . आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार आधार फाऊंडेशनचे सचिव श्री पांडुरंग तिखे यांनी केले . ॲड आशिष पाठारे याना नुकतीच वकिलीची सनद मिळाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला .आधार फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश पाठारे यांनी उपस्थितांचे आभार मानले .यावेळी प्रमुख पाहुणे चैतन्य नागरी पतसंस्थाचे संस्थापक श्री मारुतीदादा साठे ॲड. प्रथमेश रजपूत,श्री रविंद्र कुलकर्णी , गुप्ते सर , देव क्लासेस चे देवकुमार पाटील , शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर , विशाल पाठारे बबनदादा फाटक , पुरंदरे हायस्कुलचे मुख्याध्यापक बारावकर , अंकुश खिल्लारे,कडु मॅडम ,सुर सम्राटचे शत्रुघ्न खंडेलवाल , राजेंद्र मांढरे , मिलिंद सोनवणे , आतीष भांगरे ,मनोहर भालेराव ,चंद्रकांत गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रकाशभाऊ पाठारे, पांडुरंग तिखे,विठ्ठल जाधव,भगवान घनवट,शशिकांत खंडेलवाल, हनुमंत साबळे, मनिषा भांगरे,अब्बासभाई खान,प्रफुल खंडेलवाल,राजेंद्र लाड,दत्ता लाड, राजुभाई शेख,उत्तम ठाकर, गौतम रावळ, गणेश जाधव,श्रीकांत शिंदे, गोरख चौधरी,सत्यनारायण आगरवाल,राजेंद्र मांढरे,प्रताप भाग्यवंत,प्रमोद बंसल,रश्मी शिरसकर , संद्या गव्हले ,प्रतिक्षा महाडिक, शोभा मांढरे , सुमती पिंजण आदि सर्व आधार फौंडेशनचे सदस्य यानी परिश्रम घेतले.




