मावळ तालुक्यातील विविध भागांतील भात पिकांच्या प्लॉटची बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी,वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करावे

मावळ मराठा न्युज :- मावळ,कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथून उपस्थित झालेले शास्त्रज्ञ डॉ. श्री दत्तात्रय गावडे तसेच डॉक्टर किरण रघुवंशी कीड रोग शास्त्रज्ञ भात संशोधन केंद्र लोणावळा तसेच कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मावळ तालुक्यातील विविध भागांतील भात पिकांच्या प्लॉटची बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना भात पिकावर येणारे रोग व किडी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात भातावर येणारे प्रमुख रोग म्हणजे करपा, कडाकरपा व शेंडे करपा या रोगाविषयी माहिती दिली या रोगामुळे भाताची पाने पिवळी पडून भात पीक शेंड्याकडून करपत येते तसेच पानावर तांबड्या रंगाचे डाग पडतात या रोगाच्या नियंत्रणासाठी नत्र खताचा योग्य वापर करावा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्साकोनोझोल ५ % इसी २० मिली किंवा कार्बन्डाझिन ५० % डब्ल्यू पी ६ .५ ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. कडाकरपा या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपरऑक्झीक्लोराइड (सीओसी) ५० डब्ल्यू पी २५ ग्रॅम अधिक ऍग्रोमायसिन १ .५० ग्रॅम अधिक स्टीकर १० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवाकोनिका ( कासुगामायसीन ५% + कॉपर ऑक्झिक्‍लोराईड ४५%) – २ मिली / एक लिटर पाण्यामध्ये स्टिकर्स मिसळून फवारणी करावी अथवाकासु -बी (कासुगामायसीन ३ एस एल) १मिली / एक लिटर पाण्यामध्ये स्टिकर्स मिसळून फवारणी करावी.तपकिरी ठिपके या रोगासाठी प्रोपिनेब ७० टक्के डब्ल्यू पी ३० ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्याचप्रमाणे भातावर येणाऱ्या विविध किडी पैकी तपकिरी तुडतुडे, खोडकिडा, या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७ .८ एस एल १२५ मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के एस सी १५०० मिली प्रति पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाने गुंडाळणारी अळी, खोडकिडा, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ऍसिफेट ७५ टक्के एस पी ६०० ग्रॅम ५०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. लष्करी अळी व लोंबी तील ढेकण्या या किडीच्या नियंत्रणासाठी मिथिल पॅराथिऑन २ टक्के भुकटी प्रति हेक्टरी २५ किलो या प्रमाणात धुराळावी अशाप्रकारे रोग व कीड नियंत्रणाचे उपाय सांगून उपस्थितांचे शंका निरसन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page