गिरीमित्र गिरीभ्रमण संस्थात्मक कार्य सन्मान हा पुरस्कार शिवदुर्ग मित्र,लोणावळा ला मुबंईत सन्मानपूर्वक प्रदान



मावळ मराठा न्युज:- मुंबई दिनांक १३/०७/२०२४ व १४/०७/२०२४ रोजी महाराष्ट्रातील गिर्यारोहकांचे गिरी मित्र संमेलन वर्षे २१ वे नुकतेच महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड मुंबई येथे पार पडले. गिरीमित्र गिरीभ्रमण संस्थात्मक कार्य सन्मान हा पुरस्कार शिवदुर्ग मित्र, लोणावळाचे सचिव सुनिल गायकवाड यांना मिळाला. संमेलनाचे प्रमुख पाहुणे जागतिक किर्तीचे पोलंडचे जेष्ठ गिर्यारोहक Krzysztof Wielickiक्रिझताफ (क्रिस्ती)विलिन्की व इतिहास संशोधक अभ्यासक प्रविण भोसले यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.गिरी मित्र संमेलनाचे नियोजन चांगले होते, सर्व दिग्गज लोकांच्या भेटीगाठी या माध्यमातून होत असतात. महाराष्ट्रातील शोध व बचाव मोहिमा यांचीही आकडेवारी व प्रत्येक संस्थेचे कार्य यामध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्कु टिम चे कौतुक करण्यात आले व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यशवती हायकर्स खोपोलीचे संस्थापक जेष्ठ गिर्यारोहक पद्माकर गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार स्विकारताना योगेश उंबरे, सुनिल गायकवाड, रतन सिंग, सिद्धार्थ आढाव उपस्थित होते .




