अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने खंडाळा येथे शालेय साहित्य आणि टपरीधारकांना छत्री वाटप

मावळ मराठा न्युज :-खंडाळा,महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते तसेच उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त पार्थ पवार फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिवन गायकवाड यांनी खंडाळा गावातील संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गोड खाऊ, छत्री,शालेय साहित्य वाटप केले. लहान मुलांचे हस्ते केक कापून अजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच राजमाची गार्डन येथील टपरी धारकांना छत्रिंचे वाटप करण्यात आले. या वेळी श्री साहेबराव टकले, लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विलास बडेकर, सनी पाळेकर,जाखिर खलिफा, अनंता थोरात, प्रदिप कचरे,सुरेश गायकवाड,संतोष मानकर,सुरेश शिंदे, सुरेश गायकवाड, सुरेश गायखे, हरिभाऊ देवडा,प्रकाश मातेरे, विकास बोत्रे,राजू जाधव, गोपीचंद सोनवणे,विलास मातेरे,परेश बनसोडे,महादेव जगताप, संतोष सपकाळ,वदन बच्चे, अकतर बेलिम, रहीम शेख,अमोल कदम, धनंजय जांभुळकर, सागर कदम,भरत जाधव,अरुण सातकर, जितेंद्र गायकवाड सचिन जाधव, बबन शिंदे, दिपक धुळे, रविकांत गुप्ता, सुभाष दळवी, आबा पाटील,रोहन सरवदे संदीप सपकाळ, गणेश वाडकर राजू निकम, संतोष काकडे, मंगेश कचरे, सचिन कचरे, आदी युवक,सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page