पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात ९ ऑगस्ट २०११ रोजी शहीद झालेल्या हुतात्म्यास शिवसेनेच्या वतीने आदरांजली


मावळ मराठा न्यूज़:- पवननगर, पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात ९ ऑगस्ट २०११ रोजी शहीद झालेल्या हुतात्म्यास दरवर्षी प्रमाणे शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पु ल देशपांडे राष्ट्रीय महामार्ग( एक्स्प्रेस हायवे ) बऊर इथे व येळशे ऐथील स्मृती स्थळी पूजन करण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा शिवसेनेचे संघटक माजी जिल्हा प्रमुख श्री मच्छिंद्रजी खराडे,माजी उप जिल्हाप्रमुख श्री भारत ठाकूर, काँगेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री यशवंत मोहळ,माजी सरपंच श्री रामभाऊ सावंत, उप तालुकाप्रमुख सरपंच श्री चंद्रकांत भोते, आंदोलनात जखमी झालेले श्री मारुती खिरिड ,शहर प्रमुख श्री सुरेश गुप्ता, विद्यार्थी सेनेचे माजी तालुका अध्यक्ष श्री महेश खराडे, श्री उमेश ठाकर, श्री अनिल भालेराव,अक्षय कालेकर, यश खराडे, सौरभ कडू, श्री दत्तात्रय चोरघे श्री विशाल पाठारे श्री सुनिल इंगुळकर आदी पदाधिकारी होते.




