*शिवसेना परिवाराच्या वतीने अमानुष गोळीबारामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली*






मावळ मराठा न्युज -मावळ,पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प अंतर्गत झालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे आंदोलनात पोलिसांच्या अमानुष गोळीबारामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांना सालाबाद प्रमाणे श्रद्धांजली वाहण्याकरिता शिवसेना परिवाराच्या वतीने मा. जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर. पवनानगर शहर प्रमुख सुरेश गुप्ता काले माजी उपसरपंच अनिल भालेराव सनी मोहिते सतीश गोणते अंकुश वाघमारे शाखाप्रमुख उमेश ठाकर बाळा पांडे निशांत क्षीरसागर.. यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्याविषयी भावनिक होऊन शहीद शेतकऱ्यांची नावे घेऊन अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.



