भुशी डॅम परिसरातील हातावर पोट असलेल्या व्यावसायिक यांच्यापुढे पोटा पाण्याचा प्रश्न – किरण गायकवाड



मावळ मराठा न्युज- लोणावळा, येथील सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यांनी भुशी डॅम वरील हातावर पोट असलेल्या ज्यावर प्रशासनकडून कोणतीही आगाऊ पूर्व सूचना न देता त्यांच्या छोट्या छोट्या टपऱ्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला. त्यांची अत्यंत दयनीय अवस्था कोणतीही चूक नसताना प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली.त्यांना न्याय मिळावा या साठी मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांना मेल द्वारे विनंती केली आहे. पर्यटन नगरी म्हणूनच जगभरात ओळख असलेलं लोणावळा शहर आणि आजूबाजूचा ग्रामीण परिसराची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे येथील पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र चार आठवड्यापूर्वी अनपेक्षित घडलेल्या भुशी धरण अपघातानंतर येथील या पर्यटन व्यवसायावर अक्षरशः दृष्टचक्र फिरले आहे. आधी हा अपघात आणि नंतर पावसाचे कारण देत प्रशासनाकडून येथील पर्यटन स्थळांवर अनेक प्रतिबंध लागू करण्यात आले. या प्रतिबंधाखाली येथील हातावर पोट असलेला व्यावसायिक अक्षरशः पिळवटून निघाला आहे. प्रशासनाच्या या प्रतिबंधामुळे पर्यटकच जर इकडे फिरकले नाही तर आम्ही आमचं, आमच्या बायका मुलांचं, कुटुंबाचं पोट कसं भरायचं? आम्ही उपाशी मारायचं की फाशी घेऊन मरायचं? तुम्ही स्वतः ह्या गंभीर विषयावर लक्ष देऊन आम्हाला ज्ञाय द्यावा ही विनंती मी लोणावळेकर यांच्या वतीने किरण गायकवाड यांनी केली आहे.




