दुपारची २ ची लोकल,लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या यासाठी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने आज खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची आज भेट घेऊन लोणावळा रेल्वे स्टेशन वर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात याव्यात व दुपारची २ ची लोणावळा-पुणे लोकल चालू करण्यासाठी निवेदन देऊन मागणी करण्यात आली.लोणावळा रेल्वे स्टेशन मध्ये पूर्वीपासून सगळ्या एक्सप्रेस गाड्या थांबत होत्या परंतु कोरोना नंतर काही एक्सप्रेस गाड्या थांबा घेत नाहीत सगळ्या एक्सप्रेस टेक्निकल हॉल्ट साठी खंडाळा येथे थांबतात त्यामुळे लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील नागरिकाना – शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी – महिला भगिनी – दूध व्यावसायिक – छोटे मोठे व्यावसायिक यांना त्रास सहन करावा लागत आहेसर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत करावा व दुपारची लोणावळा- पुणे लोकल चालू करण्यात यावी अशी मागणी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. रेल्वे मंत्री मा श्री अश्विनी वैष्णव यांना भेटून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिलेयावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, उपतालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, सोशल मीडिया समन्व्यक नंदू कडू, विभागप्रमुख प्रमोद लोहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते..

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page