हौशी शिवदुर्ग मंडळ यांच्या वतीने क्रीडा पटू शिवभक्तांचा सन्मान



मावळ मराठा न्यूज – लोणावळा,दरवर्षीप्रमाणे यावर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोणावळा व ग्रामीण परिसरातील राष्ट्रीय खेळाडू व विविध प्रकारात प्राविण्य मिळवलेले तरुण-तरुणींचा,यात श्री.शिववंदना समुह आणि या खेळाडूंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. लोणावळा ते मुंबई ११० किलोमीटर प्रवास करणारे सायकलवीर कु.शैलश नितेशजी कुटे,कु.शर्वरी नितेशजी कुटे,कु.अवधूत कैलास कडूसकर,कु.अनघ अमोल रसाळ १० वर्षच्या मुलांचा तसेच राष्ट्रीय खेळाडू वेटलिफ्टिंग/ पाॅवर लिफ्टिंग खेळाडूचे कु.तनिष्क भरतजी बच्चे,कु. खुशी बलबहादुर बडेला, १४ वर्षीय कु.अक्षद तिकोणेनागफणी (ड्युक्सनोज) सुळका ३००फुट. यशस्वी चढाई,व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या गिरीप्रेमींचा सन्मान लोणावळ्यांमधील शिववंदना घेणारे यांचा सर्वांच्या हस्ते करण्यात आला. संजयजी मोरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.गेली २३ वर्षे रोज ३६५ दिवस न चुकता छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालण्यात येतो. यात सहभाग घेणारे सर्व हौशी शिवदुर्ग मंडळ लोणावळा अनिल विश्वासराव ,राजू बोडके, धनंजय कामत,रुपेश नांदवटे,विनायक आंबेकर,नागेश तारे, उल्हास पाळेकर, तुषार केदारी, भरत भरणे यांचा यात मोठा सहभाग असतो.




