*महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुकचे महत्वाचे पाऊल*







मावळ मराठा न्युज – कुसगाव,मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत चे महिला सक्षमीकरण च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. हॅन्ड इन हैड इंडीया, तळेगाव दाभाडे, आणि नॉर्मण्ट नॉर्मेट इंडीया CSR आणि कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या महिला बचत गटांना कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योजकतेसाठी सहाय्य करण्यात येत आहे.या प्रकल्पचा मुख्य उददेश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्या अनुषंगाने दिनांक ९ जुलै ते २६ जुलै २०२५ दरम्यान कुसगाव गावतील महिलांसाठी बॅग बनविण्याचे प्रशिक्षण यशस्वीपणे आयोजीत करण्यात आले.मागील काही दिवसात ८० महिलांना सौदर्य आणि आरोग्य तसेच मसाले तयार करणे, झटपट मिश्रण तयार करणे, तसेच भरतकाम अशा विविध उत्पन्नक्षम उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण सोबतच आयोजीत करण्यात आलेला व्यवसाय विकास प्रशिक्षण आणि अभ्यास दौरा देखील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास व तों वाढविण्यास उपयुक्त ठरत आहे. यामुळे त्या स्थिर उत्पन्न मिळवत आहेत. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनात वाढ झाली आहेच.शिवाय यांच्या कुटुबंच्या सामाजिक-आर्थिक स्थितीतही सुधारणा झाली आहे.या संधीमुळे अनेक महिलांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त करून त्याचे जीवन बदलले आहे, आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आशा निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी आहे. आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी हॅड इन हँड इंडिया आणि नॉर्मेट CSR,आणि कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत यांच्या संयुत्त प्रयत्नांचा हा उपक्रम एक यशस्वी टप्पा ठरला आहे. यासाठी कुसगाव ग्रामपंचायत चे भरघोस सहकार्य लाभले.



