टीबी मुक्त भारतसाठी खेड तालुका स्तरावर प्रशिक्षण उत्साहात,बीसीजी लसीकरण ३ सप्टेंबर २०२४ पासुन मोहीम

मावळ मराठा न्युज :-आळंदी,(अर्जुन मेदनकर)टीबी मुक्त भारत साठी खेड तालुका स्तरावर उत्साहात प्रशिक्षण देण्यात आले. १८+ बीसीजी लसीकरण अभियान राबवून टीबी मुक्त भारत व्हावा यासाठी तालुका स्तरावर प्रशिक्षण शिबिरातून देण्यात आले. या प्रशिक्षणा नंतर प्रत्यक्ष Adult बीसीजी लसीकरण ३ सप्टेंबर २०२४ पासुन ही लसीकरण मोहीम फक्त पुढील तीन महिन्याच्या कालावधीसाठी राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगतले. Adult TB implementation स्टडी प्रोग्राम खेड तालुक्यात राबविण्यात येणार आहे. पुणे ग्रामीण विभागाचा देखील यात सहभाग असणार आहे. खेड तालुक्यातील सर्व गावांत ही मोहिम राबवण्यात येणार असुन त्याची पूर्वतयारी, प्रशिक्षण व सर्व्हे पूर्ण झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ विलास माने यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या मोहिमेत तसेच प्रशिक्षण मध्ये सर्व वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहायक व सहायिका, आशा स्वयंसेविका यांचा मोहिमेत सक्रिय सहभाग राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. Adult BCG याचा वापर केल्यास “2025 अखेर टी बी मुक्त भारत” हे उद्देश गाठता यावे यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. मोठ्यांना (selected १८+ वर्ष) बीसीजी लस दिल्यास त्यांना होणारा “TB आजाराचे” प्रमाण कमीत कमी ४० टक्केने रोखता आले तरी तेवढे रुग्ण रोखल्याने फायदा होऊ होणार आहे. लसीकरणाचे लाभार्थी यामध्ये मागील पाच वर्षात TB झालेले रुग्ण, ऍक्टिव्ह TB असणाऱ्यांचे सहवासी, BMI <१८, स्वयं घोषित स्मोकर, स्वयं घोषित मधुमेही, ६०+ नागरिक या सहा कॅटेगिरी चे सर्व लाभार्थींची नोंद घेत उपाय योजना केली तर यांच्यातील ८६ टक्के टीबी रोखण्यास मदत होणार असल्याने प्रशिक्षण देऊन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने यांनी सांगतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page