विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास Add on कोर्सेस प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या Add on कोर्सेसच्या पहिल्या बॅचचा प्रमाणपत्र सोहळा साजरा करणात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही प्रत्येक शिक्षकाची नैतिक जबाबदारी असते हेच ध्येय मनाशी बाळगून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात विविध कम्प्युटर कोर्सेस ची सुरुवात करण्यात आली.शासनाच्या बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे Add on कोर्सेस करून मुलांना credit point मिळवणे बंधनकारक आहे. हे credit point मिळवण्याकरिता विद्यार्थी वेगवेगळ्या संस्थेमार्फत कोर्सेस करीत होते आपण हेच कोसेंज विदयार्थाना माफक दरात उपलब्ध करून दिला तर मुलांना याचा खुप फाएदा होईल या अनुशंगाने Add on ercourse ची महाविद्यालयात सुरुवात झाली.लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे सर्व विश्वस्त, सचिव, प्राचार्य डॉ.देशमुख सर, उपप्राचार्य डॉ. पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच हे कोर्स महाविद्यालयात सुरू करण्यामागेसुरू करण्यामागे डॉ.मित्रा मॅडम , डॉ. काटकर सर आणि सहाय्यक प्राध्यापक सोनम यादव यांनी प्रमुख भूमिका बजावली. त्याचप्रमाणे Global infotech चे संचालक श्री योगग खंडेलवाल यांनी आपला काही आर्थिक फायदा न पाहता आपल्या विद्यार्थाना हे कोसेस माफक दरात उपलब्ध करून दिले. या सुरू झालेल्या कोर्सेस मध्ये एकूण ५५ विद्याथ्यांनी यशस्वीपणे उत्तीर्ण झाले. हे कोर्सेस यशस्वीरित्या पार पाडण्यात जे पाडण्याचे जेवढे श्रेय महाविद्यालयाला जाते तेवढेच आपल्या विद्यार्थ्यांनाही जाते या कोर्सेस ला मुलांचा आणि कार्यालयातील इतर नॉन टीचिंग स्टाफचा भरभरून प्रतिसाद मिळाला अशाप्रकारे हा सोहळा महाविद्यालयात अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page