विसापूर किल्यावरून पाय घसरून पर्यटक अर्जुन यास रात्री बारा वाजता शिवदुर्ग आणि मावळ वन्य जीव संस्था टीमने सुखरूप वाचवले


मावळ मराठा न्यूज़ पाटण,मावळ,प्रतिनिधी ,अर्जुन पाटील, शैलेश गायकवाड, विक्रम जाधव, उतारेश्वर सुरवस हे चार मित्र पुण्याहून मुळचे सर्व मिरज सांगली , किल्ले विसापूर येथे दुपारी एक वाजता फिरायला आले होते सायंकाळी पाच वाजता यातील अर्जुन पाटील हा इतर मित्रापासुन बाजूला चालत गेला व वाट चुकला. मी खाली गावाकडे चाललो आहे असा पहिला फोन बरोबरच्या मित्रांना केला . थोड्या वेळाने मी पडलो आहे, मला मदतीला या असा फोन केला. बरोबरचे मित्र त्याला शोधत खाली गावापर्यंत आले . गावातील लोकांना घडलेली घटना सांगितली व गावातील काही तरुण अर्जुनला शोधण्यासाठी निघाले .त्याच वेळी शिवदुर्ग रेस्कू टिमला सात वाजता मेसेज आला होता. पण स्थानिक लोक त्याला शोधून खाली गावात घेऊन येतील म्हणून वाट बघत बसलो . रात्री ९ .२० ला स्थानिक लोकांनी फोन केला की मदतीला या. त्याचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे. मुक्का मार लागला आहे. हनुवटीला मार लागला आहे, दात पडले आहेत. मग शिवदुर्ग टीम निघाली , अर्जुन उभा राहत होता पण चालताना पाय नीट पडत नव्हते. वाट धबधबे , चिकट शेवाळलेले दगड, चिखल, दाट झाडी झुडपे. यामध्ये त्याला चालवणे योग्य वाटत नव्हते म्हणून स्पाइन बोर्ड लावून स्केडच्या स्ट्रेचर मधून गावात आनले, पाटण गावातील लोकांनी खुप सहकार्य केले. रात्रि १२ .०० वाजता खाली गावात पोचलो. गावातील लोकांनी त्याची चहा पाण्याची स़ोय केली. त्याला बदलण्याचा कपडे दिले. त्यांचे मित्र तोपर्यंत पाटण पर्यंत पोहचले होते त्यांच्या गाडीत अर्जुनाला बसवून दिले व इतर मित्रांना लोणावळा रेल्वे स्टेशनला सोडून टीम घरी रवाना झाली .यावेळी शिवदुर्ग मित्र लोनावळा, व् वन्यजीव रक्षक मावळ संस्था च्या आजच्या टिम मधे योगेश उंबरे,प्रणय अंभूरे,कुणाल कडु ,रतन सिंग,आदित्य पिलाने,सिध्देश निसाळ अमोल सुतार,योगेश दळवी ,मयुर दळवी,सागर कुंभार,अजय मयेकर,चंद्रकांत बोंबले,अनिल आंद्रे सुनिल गायकवाड ,संभाजी तिकोणे,रवींद्र तिकोणेविनायक तिकोणे यानी आपला सहभाग नोंदवला.




