प्राधिकरणात डीनर विथ सोल्जर्स

मावळ मराठा न्युज :-निगडी प्राधिकरण, (प्रदीप गांधलीकर )दिनांक : ०४ मे २०२४) नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा भारतीय भूतपूर्व सैनिक संघ आणि श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डीनर विथ सोल्जर्स (सैनिकांसोबत स्नेहभोजन) या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक ०६ मे २०२४ रोजी सायंकाळी ०६:३० ते रात्री ९:०० या कालावधीत श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक २४, लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे, निगडी प्राधिकरण येथे हा उपक्रम संपन्न होणार असून त्यामध्ये सायंकाळी ६:३० वाजता स्वागत आणि सत्कार, ६:४५ वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा आणि मनोगत रात्री ७:३० सामुदायिक महाआरती आणि रात्री ८:०० ते ९:०० सुरुची स्नेहभोजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्य संयोजक चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे, पुणे जिल्हा भारतीय भूतपूर्व सैनिक संघाचे मानद सचिव दत्तात्रय कुलकर्णी आणि श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page