सर्वसामान्य नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये व अफवा पसरवू नये व शांतता राखावी

मावळ मराठा न्यूज़,लोनावला:-(सुरेश कदम ) सद्या महाराष्ट्रात अफवावांचे पेव फुटले आहे.सोशल मीडिया वर कोणी काहीही टा कत असल्याने जगाच्या पाठीवर कुठेही काही घडले की काही मिनीट मधे अफवा पसरली जाते त्याचे परिणाम काय होतील याचे भान देखील कुणाला राहिलेले नाही. दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणार्या घटना कशा घडवुन आणल्या जातात यासाठी पनवेल नवी मुंबई व सोलापूर मधील खालील उदाहरणे बोलकी आहेत.१)पनवेलमधील सोसायटीत PFI जिंदाबादचे स्टिकर्स लावणाऱ्याला अटक; खुलासा ऐकून पोलिस चक्रावलेपनवेल मध्ये पीएफआय जिंदाबाद असे मेसेज लिहिलेले स्टीकर्स आणि सुतळी बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली होती. पनवेलमधील एका गृहनिर्माण सोसायटीत हा प्रकार घडला होता. PFI चे स्टिकर लावून सुतळी बॉम्ब ठेवणा-याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा सोसायटीचा सदस्य आहे. सोसायटीच्या आवारात PFIचे स्टिकर लावून सुतळी बॉम्ब ठेवल्याची कबूली आरोपीने दिली आहे. हे कृत्य का केले याचा खुलासा देखील त्याने केला आहे. त्याचा खुलासा ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. २५ जून रोजी हा प्रकार घडला होता. नवीन पनवेल सेक्टर १९ मधील नीलागण सोसायटीच्या आवारात PFI जिंदाबाद असे मेसेज लिहिलेले स्टीकर्स आणि सुतळी बॉम्ब नागरिकांना आढळले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी पाहणी करुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. असा सापडला आरोपी!केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे स्टिकर, दोन सुतळी बॉम्ब आणि एक विझलेली अगरबत्ती ठेवून रहिवाशांमध्ये भिती पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी नवीन पनवेल सेक्टर-१९ मधील निलआंगन सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. सोसायटीतील पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये असलेल्या वादातून त्याने हा प्रकार केल्याचे समोर आलेय. या प्रकरणाचा तपास सुरु असताना सोसायटीचा एक पदाधिकारी पोलीस तपासाचा सतत मागोवा घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी सदर पदाधिकाऱ्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता, सोसायटीचे पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये वाद असल्याने रहिवाशांना त्रास व्हावा या हेतूने त्यानेच सदरचे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती खान्देश्वर पोलिसांनी दिली.२)सोलापुरात पाकचे झेंडे असणारे फुगे विक्रीला; मुस्लीम बांधवांनी विक्रेत्याला पकडलं आणि.सोलापूर: सोलापूर शहरातील होटगी रस्त्यावरील शाही आलंमगिर ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांनी जागृकता दाखवत एका विक्रेत्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ईदगाह मैदानासमोर एक फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, लव्ह पाकिस्तान असा मजकूर लिहिलेल्या फुग्यांची विक्री करत होता. अनेक मुस्लीम बांधव हे आपल्या मुलांना घेऊन नमाज पठणासाठी ईदगाह मैदानात येतात. अनेकदा ही लहान मुलं फुग्यासाठी हट्ट धरतात. नमाज पठणासाठी आलेले मुस्लीम बांधव हे मुलांच्या हट्टासाठी फुगे विकत घेतात. सकाळी नमाज पठणसाठी आलेल्या मुस्लीम बांधवांचे लक्ष एका फुगेवाल्याकडे गेले. त्याच्याकडे असलेल्या फुग्यांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता. हे लक्षात येताच जागरूक मुस्लीम बांधवांनी ताबडतोब या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांना माहिती दिली व फुगेवाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अजय पवार रा. पारधी वस्ती,विजापूर रोड, सोलापूर असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, नमाज सुरू होण्याआधी काही मुस्लीम बांधवांचं लक्ष गेल्यावर फुगेवाल्याला पाकिस्तान समर्थक मजकूर लिहिलेल्या फुग्यांची विक्री का करत आहेस, असा जाब विचारला. हे फुगे किती जणांना विकले, असे विचारला असता फुगेवाल्याची भंबेरी उडाली होती. हा फुगा एखाद्या मुस्लीम समाजातील लहानग्याने हातात घेतला असता आणि त्याचे फोटो किंवा व्हि.डि.ओ. सोशल मीडियावर व्हायरल झाले असते तर मोठे वादंग निर्माण झाले असते. मुस्लीम धर्मीयांच्या सणादिवशी ईदगाह मैदानावर पाकिस्तान समर्थनाचे फुगे विक्री केल्याची बाब गंभीर आहे. हे फुगे विक्री करणारे सर्वसामान्य आणि गोरगरीब आहेत. पण यामागे षडयंत्र रचणारे कोण लोक आहेत, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करणारे निवदेन पोलीस निरीक्षक विजापूर नाका यांच्याकडे देण्यात आले आहे.अशा घटना घडवुन तेढ निर्माण करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्नात देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये व अफवा पसरवू नये व शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावेत,शांतता राहीली तरच देशाची प्रगती होणार आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page