लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांचे पोलीस संरक्षण काढले,खासदार सुनेत्रा पवार यांना निवेदन



मावळ मराठा न्युज :-लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,सचिव महाराष्ट्र प्रदेश RPI आठवले तथा सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती हे मागील साधारणतः ३५ ते ४० वर्षापासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत असून या काळात कित्येकदा दलित समाजातील अन्याय अत्याचारग्रस्त पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे, असे सामाजिक कार्य करीत असताना कित्येकदा त्यांनी समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा रोष हा ओढावून घेतला आहे .त्यामुळे त्यांच्या जिविताच्या संरक्षणार्थ त्यांना निशुल्क पोलीस संरक्षण देण्यात आले होते, परंतु आचारसंहितेचे कारण सांगून हे पोलीस संरक्षण आता काढण्यात आले असल्याचे समजते असे असले तरी इतर काही राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे पोलीस संरक्षण हे कायम ठेवण्यात आल्याचे देखील समजते त्यामुळे मा. सूर्यकांत वाघमारे यांचे देखील पोलीस संरक्षण पूर्ववत करण्यात येण्याबाबतच्या सूचना संबंधितांना कराव्यात अशा प्रकारची मागणी आज दि.१८/१०/२०२४ रोजी खा.सुनेत्रा अजित पवार यांना भेटून करण्यात आली. यावेळी सुनिल शिंदे सचिव पश्श्चिम महाराष्ट्र RPI आठवले,रविंद्र(पप्पू)सोनवणे, युवक कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा RPI आठवले,अभिजीत कांबळे बारामती शहर अध्यक्ष RPI (आठवले) हे उपस्थित होते.




