लोणावळा शहरातील सर्व शाळा १५ ऑगस्ट पर्यंत फक्त शनिवारी बंद ठेवाव्यात- जितेंद्र कल्याणजी

मावळ मराठा न्युज -लोणावळा, लोणावळा या पर्यटन शहरात पावसाळ्यात दिवसें दिवस वाढणा-या गर्दीमुळे शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना त्या प्रचंड गर्दीच्या कोंडीमुळे शाळे मध्ये जाणे येणे भयावह झाले आहे त्यातल्या त्यात दर शनिवारी व रविवारी शहरातील प्रत्येक रस्त्यावर चौकामध्ये शाळेच्या परिसरात या गर्दीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होतात विविध अपघात घडू नये यासाठी शनिवारी सुट्टीचा निर्णय हा फक्त १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत आपण आपल्या आदेशान्वये करावा अशी असंख्य शाळेतील पालकांची कळ कळीची विनंती आहे शनिवार व रविवारी या जोडून येणा-या सुट्टीमुळे पावसाळयामध्ये लोणावळयात येणा-या पर्यटकांची संख्या सर्वांना ज्ञात आहे विविध शाळांमध्ये येणारे विद्यार्थी हे लोकल, बस, रिक्षा, व्हॅन व काही चालत येणारे विद्यार्थी आहेत गर्दीमुळे अपघात या दुर्घटना होऊ नये यासाठी लोणावळा शहरातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही कमी असते लोकलच्या माध्यमातूनप्रवास करणारे विद्यार्थी प्रचंड गर्दीतून शाळेत कसा बसा पोहोचण्याचा प्रयत्न करतात तसेच शाळा सुटल्यानंतर ही या विद्यार्थ्यांना जाताना टारगट टवाळखोर मुलांचा त्रास जाणवल्याच्या घटनाही कानावर आलेल्या आहेत विशेष करून मुलींना याचा जास्त मनस्ताप सहन करावा लागतो म्हणून वरील सर्व तक्रारी वाढू नयेत अपघात घडू नयेत यासाठी सर्व नागरिक पालकांच्या वतीने हे निवेदन आपणासमोर मांडत आहोत भविष्यात लोणावळा शहराचे नाव विविध वाईट गोष्टीमुळे खराब होऊ नये यासाठी दर शनिवारी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शहरातील सर्व शाळा असण्यात ही मागणी करत आहोत शनिवारी रिक्षा, व्हॅन व 2 विद्यार्थी वाहतूक शनिवारी न घेऊन जाण्याचा नकार दिला आहे.तरी आपण वरील सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून विद्यार्थी हित आणि लोणावळा शहराचा नाव लौकिक टिकावा यासाठी योग्य निर्णय घेऊन पालकांचा विद्यार्थ्यांचा जरूर विचार कराल ही कळकळीची विनंती आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page