विमान तळ पोलिसांनी तातडीने आरोपी आणि त्याला मदत करणारे सर्वाना तातडीने अटक करावी – तृप्ति देसाई


मावळ मराठा न्यूज़ ,पुणे :- भाऊबीजेच्या दिवशी एका तरुणीला किडनॅप करून तिचा विनयभंग करण्यात आला त्या संदर्भात पुण्यात विमानतळ पोलिस स्टेशनला संदीप सुभाष घुले मांजरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार अचानक घडल्याने ही मुलगी मानसिक धक्क्याने हडपसर येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तेव्हापासून उपचार घेत आहे. या पिडीत तरुणीची तृप्ती देसाई यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली .नेमकं पुण्यात काय चालले आहे.विनयभंग,किडनॅपिंग केल्याचा गुन्हा दाखल असूनही पोलीस संबंधित आरोपीला अजूनही अटक करत नाहीत तसेच तरुणीला या सर्व आरोपींकडून तिच्या जीविताला धोका आहे पोलिसांनी तातडीने आरोपी आणि त्याला मदत करणारे सर्व यांना तातडीने अटक करावी अन्यथा संबंधित तरुणीला हॉस्पिटलमधून घेऊन तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस स्टेशन बाहेर आम्हाला यावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मावळ मराठा न्यूज़ शी बोलताना दिला आहे




