*भांडूपच्या श्री सरस्वती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी*

मावळ मराठा न्युज -मुंबई (पी. डी. पाटील ):श्री सरस्वती विद्यामंदिर, भांडूप (प) या शाळेत बुधवार दि.२९ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जयवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आईवडील, शिक्षक यांच्यावर निष्ठा व विश्वास असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर शिक्षकांनी आताच्या डिजिटल युगात विद्यार्थी व शिक्षक यांच्यात दुरावा होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षा संस्थेच्या संचालिका वर्षा वसंत सावंत होत्या. त्यांनी प्रा. पाटील यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गोळे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच आपल्या मधुर स्वरात ‘ गुरूने दिला ज्ञानरूपी वसा ‘ गीताने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या गायन, भाषण, नृत्य, कवितांतून गुरूबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. स्वामी समर्थ केंद्राचे प्रकाश गोडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांना शाळेला देणगी देऊन सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडनेरे मॅडम यांनी केले तर पर्यवेक्षक नरेंद भारंबे यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page